PM Modi : 5 ऑगस्टला काळी जादू पसरवण्याचं काहींनी काम केलं, मोदींच्या विधानावरून नवीन वाद?

तपास यंत्रणांचा गैरवापर आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे घालून आपला विरोध दर्शवला होता. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. 'देशातील काही लोक नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकार विरोधात खोटं बोलत असल्यामुळे जनता जनार्दनदेखील अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात हे लोकही आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.... अशा शब्दात मोदींनी जोरदार टीका केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola