Pankaja Munde Graduate Constituency : पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मैदानात ABP Majha
Pankaja Munde Graduate Constituency : पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मैदानात ABP Majha
मराठवाडा पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे बीड दौऱ्यावर आहेत. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंही सहभागी होणार आहेत.. पंकजा मुंडे संस्थाचालकांशी संवाद साधतील तसंच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतील. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा बीडला आले होते... मात्र फडणवीसांच्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे अनुुपस्थित होत्या.
फडणवीसांच्या दौऱ्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे बीडमध्ये येतायत आणि त्या जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे या प्रचार दौऱ्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.