Pankaja Munde On Election : निवडणूक कोणतीही असो चर्चा माझ्या नावाची होते : पंकजा मुंडे : ABP Majha
Continues below advertisement
निवडणूक कोणतीही असो चर्चा माझ्या नावाची होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. तसंच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही, असंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे या भाजपच्या गाव चलो अभियान या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतलं आणि तिथून पोंडूळ या गावात नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्या बोलत होत्या.
Continues below advertisement