Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादी पक्ष जनतेत राहिल, पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन लोकांमध्ये जाणार

Continues below advertisement

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्त्वाखाली लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. कालपासून शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जात होते. अशातच बुधवारी पुण्यात शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. परंतु, आमचा पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram