Pankaja Munde : 'मला अटक करा, अशी धनंजय मुंडेंची मागणी असेलच', पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील अंगणवाडी मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या चिक्की आणि इतर साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी पुरवठादारांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? अशी विचारणा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. एफडीएचे अधिकारी पेढे आणि बर्फीसंबंधित प्रकरणात खटले दाखल करण्यात व्यस्त आहेत. पण इथे लहान मुलांच्या आहारासंबंधित गंभीर प्रश्नांवर गुन्हे दाखल करण्यात का येत नाहीत? अशा शब्दात ताशेरे ओढत हायकोर्टानं सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.
Continues below advertisement