Sangli : सिगारेट आणण्यासाठी वेळ लागल्याने मित्राची हत्या, हत्येनंतर तुकडे करून बोअरवेलमध्ये टाकले

सांगली : सांगलीतील मिरज तालुक्यातील भोसेमध्ये मित्राचा खून  करून तुकडे कूपनलिकेत टाकत  क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. मद्यपान करत असताना केवळ  सिगारेट आणण्यासाठी वेळ लागल्याने ही हत्याची घटना घडलीय. दत्तात्रय शामराव झांबरे(वय 24) असे  हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दत्तात्रयच्या खूनप्रकरणी अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर (27) आणि सागर सुरेश सावंत  (25)  या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola