'तुम्हाला उमेदवारी कशी मिळते मी बघतो', भारत भालकेंच्या गादीसाठी युवराज पाटलांनी दंड थोपटले

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आता पक्षातूनच आवाज उठू लागले आहे. तुम्हाला उमेदवारी कशी मिळतेय ते पाहतो असे थेट आवाहन भारत भालकेंचे सहकारी आणि माजी आमदार कै औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी दिले आहे. याला कारण ठरले राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाला काढून भगीरथ भालके यांनी त्यांच्या मर्जीतले विजय देशमुख यांना त्या पदावर बसवले आणि यातूनच पक्षातील एक मोठा गट नाराज झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola