Oath Taking Ceremony | शिवतीर्थावर महाशपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात | ABP Majha
शिवसेनेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यभरातून अनेक शिवसैनिक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमायला सुरुवात झाली आहे. महाशपथविधीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.