Oath Taking Ceremony | अजित पवारच उपमुख्यमंत्री : सूत्र | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अजित पवारांचा शपथविधी आजच होणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरी, उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबत पेच होता. यापदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांचं नाव चर्चेत होतं. परंतु आता अजित पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचं कळतं.