Uddhav Thackeray & Raj Thackeray यांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ: Prakash Mahajan : ABP Majha

ठाकरे परिवार म्हणजे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. उद्धव आणि राज ठाकरेंचं नातं आणि राजकीय वैर यावर तर महाराष्ट्राच्या नाक्या-नाक्यावर अनेकदा चर्चा झडतात. २००५ साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर राज आणि उद्धव यांच्यातली दरी आणखीनच वाढत गेली. त्यानंतर अनेकदा हे दोघं एकत्र येतील अशा चर्चा होेत राहिल्या. मात्र त्यांना त्याचवेळी ब्रेकही लागला. आता या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्यात. आणि त्याला निमित्त आहे ते म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाचं. हे दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. तसंच उद्धव आणि राज यांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद देऊन राज ठाकरेंकडे नेतृत्व द्यावं, राज ठाकरे मोठ्या भावाचा सन्मान ठेवतील असंही महाजन यांनी म्हटलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola