Maharashtra Political Crisis : अजित पवारांमुळे कुणीही शिवसेनेत नाराज नाही : Uday Samant : ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकीय उलथापलाथी आणि दोन्ही गटांच्या स्वतंत्र मेळाव्यांनी कालचा दिवस गाजला. आणि त्यानंतर रात्री बैठक झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अस्वस्थ आमदारांची. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आठ आमदारांच्या राज्य मंत्रिमंडळातल्या एन्ट्रीनं शिंदे आणि त्यांची टीम भलतीच धास्तावली आहे. त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासाठी नागपुरात न थांबता मुख्यमंत्र्यांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या अस्वस्थ आमदारांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. काही आमदारांनी आपली नाराजी एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवल्याचं समजतं. पण या बैठकीनंतर आम्ही कोणीही नाराज नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं. तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचा हवाला सामंतांनी दिला