Nirmala Sitharaman On Economic : मागील तिमाहीच्या तुलनेत जीडीपीत घट, केंद्र सरकारकडुन आकडेवारी जाहीर

सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३ टक्के राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत विकास दर पहिल्या तिमाहीपेक्षा कमी असला तरी तो समाधानकारक मानला जात आहे. गेल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल-जून दरम्यान विकास दर १३.५ टक्के होता. तर गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत विकास दर ८.४ टक्के होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola