Neelam Gorhe On Kirit Somaiya: पेन ड्राइव्ह बघणं म्हणजे फार मोठी कठीण परीक्षा
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमुळे किरीट सोमय्या अडचणीत आलेत. दरम्यान याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. या व्हायरल व्हिडिओमुळे विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं