NCP | राष्ट्रवादीचे नवे मंत्री 'माझा' वर | ABP Majha
ाज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं असून गृह-अर्थ खातं राष्ट्रवादीकडे, कृषी शिवसेनेकडे तर महसूल खातं काँग्रेसच्या पदरात पडलंय.
त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या यादीवर शिक्कामोर्तब झालंय. यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आलीय तर अनिल देशमुखांकडे गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आलीय. कृषी खातं शिवसेनेच्या दादा भुसेंकडे तर, परिवहन खातं अनिल परबांना मिळालंय. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही ६ दिवसांपासून बिनखात्याच्या मंत्र्यांना आज अखेर आपापली खाती मिळाली आहेत.