NCP Crisis : अजित पवार गटाची याचिका,शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचं नाव याचिकेतून वगळले
NCP Crisis : अजित पवार गटाची याचिका,शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचं नाव याचिकेतून वगळले
शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेच्या सभापतींना पाठवलं होतं... आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केलीये..
शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीेय. महत्त्वाची बाब म्हणजे या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रीया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळण्यात आलीयत.... वंदना चव्हाण, फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलीये तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलीये.