Aaditya Thackeray Shiv Sanvad Yatra Nashik: कांदेंच्या मतदारसंघात आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा
शिवसेनेतील फुटीनंतर नाशिकच्या मनमाडमध्ये आज प्रथमच ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे. आणि कांदे यांनी या दौऱ्यात दहा हजार कार्यकर्त्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याचं जाहीर केलंय. माझं काय चुकलं अशा आशयाचं निवेदन देण्यासाठी कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.