Naseem Khan : सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील हा 'विराट मोर्चा', नसीम खान यांची प्रतिक्रिया

MVA Mahamorcha :  महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसचे नेते देखील सहभागी होणार आहेत.. नसीम खान यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola