Narayan Rane Pc | बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे | ABP Majha

Continues below advertisement
फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलीय. तसंच बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते... अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय. नागपुरात आलेल्या नारायण राणेंनी खास उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरही नारायण राणेंनी टीका केलीय. तोडपाणीसाठी नव्या सरकारकडून प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत असल्याचा आरोपही राणेंनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram