CAA Protest | राज्यभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तीव्र आंदोलन | ABP Majha
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दुसऱ्या दिवशीही देशात तीव्र आंदोलन सुरु आहेत... विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे सुरु आहेत.. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला.. हातात तिरंगा घेऊन मुस्लिम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला.. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास १ तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला.