केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला? Narayan Rane यांचा शिवसेनेवर हल्लाबोल : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की, मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले.
दरम्यान, अटकनाट्यानंतर बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला, केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला? असा हल्लाबोल सुद्धा बोलताना राणेंनी केला.
Tags :
Latest Marathi News Abp Majha BJP Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ratnagiri Jan Ashirwad Yatra BJP ABP Majha ABP Majha Video Narayan Rane Uncut Narayanj Rane