Narayan Rane: तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही; आतापर्यंत सगळ्यांना पुरून उरलो, राणेंचा टोला

Continues below advertisement

तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे. शिवसेना वाढवण्यात माझा मोठा वाटा आहे. तेव्हा आताचे कोणी नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करुदे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram