Maharashtra Government Formation | राष्ट्रपती राजवटीच्या आड राजकारण हा जनतेचा अपमान : संजय राऊत | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच त्यांनी मातोश्रीवर यावं, असं राऊतांनी नमूद केलं. शिवाय, पैसा आणि सत्तेचा वापर करुन कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो, असा आरोपही राऊतांनी केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा घणाघात राऊतांनी केला.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Press Conference Maharashtra CM Maharashtra Government Formation Sanjay Raut Shivsena