Sanjay Raut | प्रस्ताव एक ओळीचा, जे ठरलंय तेच द्या : संजय राऊत | मुंबई | ABP Majha
गेल्या बारा दिवसांपासून राज्यात निर्माण झालेली सत्तास्थापनेची कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झालीय. शिवसेनेसोबत कोणत्याही चर्चेसाठी भाजप तयार असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. मात्र लिखित आश्वासन दिल्यानंतरच शिवसेना चर्चेचा विचार करेल असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधली कोंडी फुटणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. काल मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीनंतर आज वर्षा बंगल्यावर फडणवीसांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि भाजपच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. भाजपनं शिवसेनेला प्रस्ताव दिला असून आता शिवसेनेच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचं भाजपनं जाहीर केलंय. तसंच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालीच भाजपचं सरकार येईल असं सांगायला भाजप नेते विसरले नाहीत.