Salman Khan Golibar Update : सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे
Continues below advertisement
लमान खानच्या घराबाहेरील गोळीबारप्रकऱणातील तपासाला आता वेग आलाय. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला असून . या गोळीबाराचे धागेदोरे दुसऱ्या राज्याशी जुळल्याचा संशय क्राईम ब्रांचला आहे.. त्यामुळेच क्राइम ब्रांचची टीम दिल्ली, जयपूर आणि बिहारकडे रवाना झालीये... तर या गोळीबारातील एका आरोपीची ओखळ पटली असून.. त्याचं नाव विशाल राहुल उर्फ कालू असं आहे.. त्याच्यावर हरियाणात पाचहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहे. तर या प्रकरणात आरोपींनी वापरलेली दुचाकी रायगड जिल्ह्यातून खरेदी केल्याचं समोर आलंय. ज्यांच्याकडून आरोपींनी ही दुचाकी खरेदी केली त्यांचीही चौकशी सध्या सुरु आहे... या गोळीबाराची जबाबदारी स्विकारणाऱ्या फेसबुक पेजचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करण्यात आला असून.. अनमोल बिश्नोई नावाचं हे फेसबुक पेज कॅनडातून चालवलं जात असल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement