Maharashtra Government Formation | भाजप नेत्यांची राज्यपालांना भेटून घटनात्मक पेचावर चर्चा | ABP Majha
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सध्याच्या राजकीय स्थितीवर राज्यपालांना माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यात महायुतीचच सरकार बसेल असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. मात्र, भाजप नेत्यांनी यावेळी शिवसेनेच्या भूमिकेवर बोलणं टाळलं. तसंच पत्रकारांच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तरं दिली नाहीत.
Tags :
Chandrakant Patil Sudhir Mungantiwar Ashish Shelar Bjp Leader Girish Mahajan Maharashtra Government Formation