Maharashtra Government Formation | शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले? | ABP Majha
Continues below advertisement
"मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा," अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली. "लोकसभेवेळी जे ठरलंय, ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाहीत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. "आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे.केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको. मला खोटं ठरवायचं असेल तर हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. भाजपला ठरवून बाजूला करायचं असं काही नाही, पण भाजप जर शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करेन.
अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची," असं उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत म्हणाले.
अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची," असं उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत म्हणाले.
Continues below advertisement