Maharashtra Politics | अजित पवारांसोबत गेलेले तीन आमदार परतले! | ABP Majha
एकीकडे 27 आमदार अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचा दावा भाजपने केला असतानाच, त्यांच्यासोबत गेलेले तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. अनिल पाटील आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. तर नरहरी झिरवळही दिल्लीहून निघाले आहेत. त्यांचा मुक्काम देखील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्येच असेल. आता राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदारच संपर्कात नाहीत. एक म्हणजे खुद्द अजित पवार आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे.