Mukesh Ambani यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीला, राजकीय गाठीभेटीमुळे चर्चेंना उधाण
बातमी एका भेटीची... रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली... मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर ही भेट झाली.. दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावसकर हेसुद्धा उपस्थित होते अशी माहिती मिळतेय... वर्षावरील या भेटीत अंबानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. बुधवारी जगातील दुसऱ्या क्रमांकांचे अब्जाधीश आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.. देशातील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या उद्योगपतींनी घेतलेल्या राजकीय गाठीभेटीमुळे चर्चांना उधाण आलंय...