MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

Continues below advertisement

MPSC Protest Pune: पुण्यात  MPSC च्या विद्यार्थ्यांची तीन वेगवगेळी आंदोलनं सुरु होती . रोहित पवारांच्या नेतृत्वात एस एम जोशी पुलावर सुरु असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य मागणी होती. शास्त्री रस्त्यावरील आंदोलनात परीक्षा (MPSC exam) ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी ही मुख्य मागणी होती . तर अलका चौकात सुरु झालेल्या आंदोलनात परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं घेण्यात यावी ही मुख्य मागणी होती . याशिवाय, या तिन्ही ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनातील आंदोलकांच्या काही सामान मागण्या होत्या . ज्यामध्ये सत्तर हजार जागांची पदभरती करणं , गट - ब आणि गट क पदाच्या जागा दुप्पट करणं , सर्व परीक्षांसाठी एकच स्मार्ट कार्ड लागू करण्यात यावं या तिन्ही आंदोलकांच्या सामान मागण्या होत्या ज्या 30 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, 12 दिवस आंदोलन केल्यानंतर तिन्हीपैकी एकाही आंदोलनातील आंदोलकांची मागणी थेटपणे मान्य झालेली नाही असच म्हणावं लागेल .  एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप शिंदे अध्यक्ष असलेली आणि तूआक्रम मुंडे सचिव असलेली समिती नेमण्यात आलीय . या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवारांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी आणि एम पी एस सी ची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी यासाठी सुरु असलेल्या दोन आंदोलनातील आंदोलकांची तर सरकारसोबत चर्चा करू, या आश्वासनावर बोळवण करण्यात आली आहे. 12 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी थेट मान्य झालेली नसली तरी आंदोलनाच्या दबावामुळे भीमनवारांना स्वतःहून रजेवर जावं लागलंय हे स्पष्ट आहे . राज्य सरकारमधील मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे रोहित पवारांसोबत आंदोलकांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले आणि त्यानंतर विवेक भीमनवार यांनी ते रजेवर जात असल्याचं ट्विट केलं. यामुळं आंदोलक आणि सरकार ...एक एक पाऊल मागे आले आणि वीन वीन सिच्युएशनमध्ये या आंदोलनाचा शेवट करण्याचा प्रयत्न झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola