Monsoon Session | विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन ऑगस्टपासून, विरोधकांचाही निर्णयाला पाठिंबा

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून नियोजित होते. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आता 3 ऑगस्टपासून घेण्याबाबत आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात 3 ऑगस्टपूर्वी पुरवणी मागण्यासांठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola