MNS : महिन्याला मिळणाऱ्या 'कलेक्शन'मधून शिवाजी पार्कमध्ये रोषणाई करा, मनसेचा शिवसेनेला टोला
दरवर्षी मनसे दिवाळीत विद्युत रोषणाई केली जाते, दादरमधील सेल्फी पॉईंट म्हणून अनेकजण येथे भेट द्यायला येतात. मात्र, आता शिवसेनेकडून याचठिकाणी कायम स्वरूपी रोषणाई केली जाणार आहे. थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं असून स्थानिक आमदार निधीतून या कामाला मंजुरी देण्यास सांगितलं आहे. यासाठी १ कोटी २५ लाखांचा खर्च येणार आहे. मनसेने याबाबत आक्षेप घेतला आहे, दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राज ठाकरे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. यंदा शिवसेनेनं इथे कायमस्वरुपी रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे.