Paryan Fuke : आमदार परिणय फुकेंनी घेतली ओबीसी आंदोलकांची भेट, आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण
नागपुरातील ओबीसी आंदोलनाबद्दल मोठी बातमी आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी आणि कुणबी समाजाच्या कृती समितीला राज्य सरकार २९ सप्टेंबर रोजी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. २९ तारखेला म्हणजेच पुढच्या शुक्रवारी दुपारी २ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत. याचसंदर्भादत आमदार परिणय फुकेंनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. तसंच सरकारच्या वतीनं त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलंय. यावेळी फुकेंनी तायवाडेंना मागे घेण्याची विनंतीही केली.