Maharashtra MLA Extortion : आमदारांना गंडा घालणारी टोळी जेरबंद, आमदारांना ऑफर देणारे आरोपी कोण?
राज्यात मंत्रमंडळ कधी अस्तित्वात येणार असा जनतेला प्रश्न आहेच पण मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या काही आमदारांनाही याची धाकधूक आहे.. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत आमदारांना लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीनं ३ आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. दिल्लीतून आल्याची बतावणी करत या आरोपींनी कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्यास १०० कोटी रुपये लागतील, त्यातले २० टक्के आत्ता आणि उर्वरित शपथविधीनंतर अशी अट घातली. नरिमन पॉईंटच्या ओबेरॉय हॉटेलवर या आरोपींनी आमदारांची भेटही घेतली मात्र याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.