Awhad vs Padalkar : अधिनेशनात आव्हाड-पडळकरांच्या वादाचा भडका नेमका कुठून सुरु झाला?
Continues below advertisement
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधीमंडळ परिसरात घडलेल्या घटनांनी लक्ष वेधले आहे. अकरा तारखेला जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून "मंगळसूत्र चोराचं" अशी घोषणा दिली होती. त्यानंतर काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात गाडीच्या दरवाजावरून शिवीगाळ झाली. आज या दोघांचेही कार्यकर्ते नितीन देशमुख आणि ऋतिकेश तकले हे विधीमंडळाच्या परिसरात एकमेकांसोबत भिडले. या सर्व प्रकाराची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली आहे. अध्यक्षांनी आज घडलेल्या प्रकाराचा अहवाल मागवला असून, या प्रकरणी ते काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. हा संपूर्ण प्रकार विधीमंडळ परिसरात घडला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement