Hindi Imposition | CM Fadnavis-Uddhav Thackeray भेट, विरोधी पक्षनेतेपद आणि त्रिभाषा सूत्रावर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेला आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदारही उपस्थित होते. भेटीदरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा झाली. हे पद विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असून ते का दिले जात नाही, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर, त्रिभाषा सूत्रासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरही गंभीरपणे बोलणे झाले. "हिंदीची सक्ती हवीत कशाला?" असा थेट प्रश्न चर्चेत उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पुस्तक भेट दिले. हेच पुस्तक नरेंद्र जाधवांना द्यावे, असेही ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले. या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर विचारमंथन झाले. विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आणि भाषिक धोरणावरील चर्चा ही या भेटीतील प्रमुख वैशिष्ट्ये होती.