Mihir Kotecha : रॅलीदरम्यान संजय पाटलांच्या गुंडांनी दगड भिरकावला : मिहीर कोटेचा : ABP Majha
Continues below advertisement
ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संजय दिना पाटील यांवर गंभीर आरोप केला आहे. मानखुर्दमधून प्रचार रॅलीदरम्यान संजय पाटलांच्या 'टोपीवाल्या गुंडांनी' आपल्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने दगड भिरकवल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केला. तर कोटेचा यांच्या आरोपांवर संजय दिना पाटलांनी उत्तर दिलंय. कोटेचा यांनी रडीचा डाव बंद करावा, दगडफेक झाली असेल तर पोलीस तपास करतील, असं संजय दिना पाटील म्हणाले.
Continues below advertisement