MVA On Bhagat Singh Koshyari : मविआकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी, उदयनराजेंचंही मोदींन पत्र
Continues below advertisement
छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे... आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांना दिल्लीतून पाचारण करण्यात आलं आहे. आज आणि उद्या राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण तापलंय अशातच छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.. स्वतः उदयनराजे यांनीही पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे... त्यामुळे राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची कानउघडणी होणार की उचलबांगडी हे पाहावं लागणार आहे.
Continues below advertisement