Gudi Padwa 2024 Nagpur : नागपूरमध्ये सामुहिक रामरक्षा पठण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग
Continues below advertisement
आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात, आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस! आजपासून सुरु होणाऱ्या वर्षाला क्रोधीनाम संवत्सर असं म्हटलं जातं. शालीवाहन शके १९४६ ची सुरुवात आजपासून झालीय. आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मुंबई, उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement