Mumbai BJP President | मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच, आशिष शेलार यांचं नाव पुढे
मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी अद्याप निर्णय झालेला नाही. आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुका आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या मते, महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक आहेत.