Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : आई ओबीसी असल्यास अपत्यांनाही ओबीसी दाखले द्या - मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : आई ओबीसी असल्यास अपत्यांनाही ओबीसी दाखले द्या - मनोज जरांगे
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी आपली नवी मागणी आता पुढे केलीय. जर आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर, तिच्या मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीय. त्याचसोबत आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरनंतर एक तासही मुदत देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. जरांगेंच्या नव्या मागणीबाबत छगन भुजबळ, आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी टीकास्त्र डागलंय.
Continues below advertisement