Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद

Continues below advertisement

Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद 

मुंबई : जिंकलो होsss राजेहो तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, सरकारने आपल्या मान्य केल्याचं सांगत आझाद मैदानावर एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय... गणपती बाप्पा मोरया.. अशी घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईतील आझाद मैदान परिसरात पाटील पाटील.. घोषणांनी दुमदुमला होता. जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्या आंदोलनातील मागण्या राज्य सरकारच्यावतीने मान्य करण्यात आल्या असून मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर होते. यावेळी, कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या याची माहितीही जरांगे पाटील यांनी दिली. तसेच, मराठा (Maratha) आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा अवधीही राज्य सरकारला देण्यात आला आहे.  

मी मराठा आरक्षण समितीचा स्वागत करतो, सचिव सुद्धा आज हजर आहेत, त्यांचे आभार. विषय शांततेत समजून घेण्याची गरज आहे. आपलं म्हणणं होत ते निवेदन आपण सादर केलं होत. त्यानुसार, सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत.  आपली पहिली मागणी होती, हैद्राबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करावी. आता ते म्हणाले आपल्याला मान्य झालं की जीआर काढणार, यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण अभ्यासकांसोबत सुद्धा चर्चा करणार आहोत  नाहीतर वाशी सारखा व्हायचं, असे म्हणत वाशीमध्ये आपली फसवणूक झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola