Maratha Reservation| Jarange यांच्या आंदोलनाला मोठं यश, 6 मागण्या मान्य, उपोषण मागे

Continues below advertisement
जरांगे यांच्या पाच दिवसांच्या उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. "तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो," अशी घोषणा जरांगे यांनी आझाद मैदानात उपस्थित आंदोलकांसमोर केली. मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन त्यांनी पाच दिवसांचे उपोषण सोडले. त्यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबईतून सोडण्याचे आदेश जरांगे यांनी दिले. हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करण्यात येणार आहे. सातारा गॅझेटियरमधील त्रुटी दूर करून पंधरा दिवसांत जीआर काढण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. मराठा आणि कुणबी एकच ही जरांगे यांची प्रमुख मागणी होती. या मागणीचा जीआर काढण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. मागण्यांचे जीआर निघाल्यास आंदोलकांनी व्यापलेली मुंबई पूर्वपदावर येण्यास मदत होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola