Manohar Joshi Passed Away Live Update : वयाच्या 86 व्या वर्षी मनोहर जोशींनी घेतला अखेरचा श्वास
Continues below advertisement
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं.हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले , परंतु पहाटे त्याचं निधन झालं. गेल्या वर्षीही २२ मे रोजी त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते सेमी कोमामध्ये होते. गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांना जोशी सर असंही संबोधलंं जातं. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भूषवलं होतं.
Continues below advertisement