Malwan Stunt : मालवणच्या समुद्रात पर्यटकांची स्टंटबाजी, स्थानिकांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या समुद्रात पर्यटकांची स्टंटबाजी पाहायला मिळाली. मालवण बंदरजेटी परिसरात पर्यटक गाडी घेऊन समुद्रात स्टंट करत असल्याचं समोर आलंय. स्थानिकांनी सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करत या अतिउत्साही पर्यटकांनी स्टंटबाजी सुरुच ठेवली. याआधी अशाचप्रकारच्या दोन घटनांमध्ये समुद्रात गाड्या अडकण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे किनारपट्टीवर पर्यटकांच्या स्टंटबाजीला आवर कोण घालणार असा प्रश्न निर्माण होतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola