Majha Maharashta Majha Vision | उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक योजना- मंत्री सुभाष देसाई

आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत, त्यांची ही मागणी चुकीची नाही. कोरोनाचं संकट गंभीर मात्र उद्योग सुरु करावे लागतील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागानं उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरु केली आहे. 48 तासात उद्योगासाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तात्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स ही देखील चांगला उपक्रम आपण सुरु केला आहे. याला युवकांचा प्रतिसाद करतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola