Naresh Mhaske Nomination Form : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आज आपला अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना महायुती मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.