Heat Wave : राज्यात उन्हाचा कहर! भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन कोल्ड रूम
भंडारा- मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढला आहे. भंडारा जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं असल्यानं प्रखर उष्णतेपासून नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्षाची (कोल्ड रूम) निर्मिती करण्यात आली आहे.