MVA Seat Sharing Formula : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing Sormula Announced) तिढा अखेर सुटला आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी फॉर्मुलाही जाहीर केला. उद्धव ठाकरे (शिवसेना) 21, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेवर महाविकास आघाडीमध्ये पेच होता. आज अखेर याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळाली आहे.
Continues below advertisement