Mahavikas Aghadi Mahamorcha Top Angle : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मोर्चासाठी जोरदार तयारी

Continues below advertisement

Mahavikas Aghadi Mahamorcha Top Angle : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मोर्चासाठी जोरदार तयारी

Mumbai : मुंबईत (Mumbai) आज महाविकास आघाडीच्यावतीने प्रचंड मोर्चा (Mahavikas  Aaghadi Morcha) काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram