MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीचा महामोर्चा, वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते निशाण्यावर
MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.